सोलापूरमध्ये गाडी काढायची कशी ?

सोलापूर – सोलापूर महापालिकेत बेशिस्तपणे कुठेही गाड्या लावण्याच्या प्रकाराला तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत आळा बसला होता. परंतु त्यांचा प्रभारी महापालिका आयुक्तपदाचा कार्यकाल संपताच सोमवारी पुन्हा एकदा बेशिस्त वाहतुकीचे दर्शन महापालिकेत घडले. श्री. मुंढे यांचा कार्यकाल रविवारपर्यंत (ता.10) होता. यानंतर सोमवारी पुन्हा महापालिकेतील स्थिती जैसे थे दिसून आली. सोमवारी सकाळी आयुक्त कार्यालयाजवळ, वारद पुतळ्यानजीक दुचाकी, रिक्षा… Read More »

मायबाप सरकार आमचा अंत पाहू नका

सोलापूर -आठवड्या पासून अन्नाचा दाणा नाही. उधार-उसने करून घर आजचे उद्यावर असे कसेबसे घर चालू आहे. त्यात बचत गटवाल्यांचा तगादा, नियोजित हप्ता भरा नाहीतर दंड भरा. दंड भरू, पण यासोबत होणारी सार्वजनिक मानहानी कशी सहन करायची. या नव्या वर्षात तब्बलदोनदा संप झाला. जगणे अवघड बनले आहे. संप असाच सुरू राहिल्यास सोलापूर सोडून जावे लागेल .… Read More »

शहरात सरीवर सरी

सोलापूर शहर व जिल्ह्यात काल सोमवारी दिवसभर मोठा उकाडा होता. त्यामुळे नागरिक दिवसभर या वातावरणामुळे हैराण झाले होते.त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल झाला आणि वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपासून सोलापुरात दिवसभर कडक उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी वादळी वार्‍यामुळे सोलापूरकर पुरते हैराण झाले होते.वातावरणात कमालाचा उकाडा असल्याने घरात आणि… Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी झेड पी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय व्हावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच  लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत जुनी पेन्शन योजना लागू करणे, नोकर भरतीवरील निर्बंध उठविणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणुका करणे, ग्रेड पेमध्ये सुधारणा करणे, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, सातव्या वेतन आयोगाची… Read More »

महावितरणचे कॉल सेंटर 24 तास

सोलापूर : वीजपुरवठ्यासह सर्वप्रकारच्या #तक्रारी नोंदविण्यासाठी  किंवा माहिती विचारण्यासाठी महावितरणचे मध्यवर्ती #ग्राहक सेवा केंद्र (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) 24 तास उपलब्ध आहे. त्यावर ग्राहकांना मोबाईल अथवा दूरध्वनी क्रमांक नोंदविणे सुलभ झाले आहे. यापुढे वीज ग्राहकांनी नोंदणीकृत क्रमांकावरून कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगावा लागणार नाही . 24 तास सुरू असणार्‍या कॉल सेंटरचे 1800-200-3435… Read More »

बोअरवेल वाल्यांकडून होतंय शेतकर्याचे शोषण

#माळशिरस-#बोअर, एजंट, ब्लस्टिंग वाल्यानी गेल्या तीन दिवसापूर्वी 50 रुपये फुट आणि 60 रुपये फुटापर्यंत दर नेले असून प्रत्येक बोअरसाठी जादा 1000 मागणी करत आहेत. विहिरी खोदण्याचे काम शेतकर्‍यांनी हाती घेतले तर ब्लस्टींग वाले सातबारा उतारा व प्रत्येक होलला 60रु. दर असताना 70 ते 80 पर्यंत  दर आकारत शेतकर्‍यांची पिळवणूक करीत आहेत..आधीच दुष्काळाने जीव मेटाकुटीला आला… Read More »

स्वामी समर्थांवरील चित्रपट गुढीपाडव्याला प्रदर्शित होणार

#सोलापूर – येथील #सम्राट सिनेमा कंपनीच्या वतीने ८ एप्रिलला ‘जय जय स्वामी समर्थ’ हा चित्रपट गुढीपाडव्याला सोलापुरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सर्व  कलावंत सोलापुरातील आहेत. स्वामी समर्थांची मुख्य भूमिका दत्तात्रय #श्रीराम यांनी केली असून त्यांनीच डॉ. कार्यकर्ते यांच्या सहकार्याने गीते आणि प्रशांत शिंगे यांच्या सहकार्याने पटकथा व संवाद लिहिले आहेत. निर्मितीही त्यांचीच असून प्रशांत… Read More »

सांगोल्यात अतिक्रमण हटाव मोहीम

#सांगोला-सांगोला नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील म.फुले चौकातील रस्त्यास अडथळा ठरणारी अतिक्रमणे दुकानदारांच्या प्रखर विरोधानंतरही काढून टाकली आहेत. नगरपरिषदेने #मिरज रेल्वेगेट ते #भीमनगर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी रस्त्यास अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म.फुले  चौकातील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात नगरपरिषदेने सूचना केल्या होत्या. मात्र, मूळ जागामालक व इतरांमध्ये न्यायालयात दावा सुरू होता.मात्र, नगरपरिषद पथकाने… Read More »

आयसीसी टी-२०

आयसीसी टी-२० पुरुष वर्ल्डकप – #वेस्ट इंडिज विरुद्ध #अफगाणिस्तान, नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय, अफगाणिस्तानच्या 20 षटकात 7 बाद 123 धावा.

बँका बुडव्यांना निवडणूक बंदी

  #बार्शी :शेतकर्‍यांच्या बँका नेत्यांनी पैसे खाऊन बुडवल्या आहेत. दुष्काळाला कारणीभूत घोटाळे, भ्रष्टाचार आहे. राज्य शासन शेतकर्‍यांचे पैसे वसूल करणार असून शेतकर्‍यांच्या बँका बुडवणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. बँका बुडवणार्‍यांना दहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री #देवेंद्र #फडणवीस म्हणाले.